अदभूत उत्तराखंड

परिचय

असा कोणी आहेका ? जो हिमालय पर्वत बघुन मंत्रमुग्ध झालेला नाही. आपण जेव्हा हिमालयाकडे बघतो तेव्हा नेहमीच आपल्याला अफाट हिमालय श्रेणी, बर्फाच्छादित पर्वत हे सर्व कुतूहलाची बाब म्हणून वाटतात. ज्यांना अजुन माहीती नसेल त्यांना हे जाणून घेणे आवश्यक आहे की हिमालय पर्वत श्रेणीत जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट चा समावेश होतो. हिमालयामध्ये एकूण शंभर पर्वतांची उंची ७.२०० मीटर (२३,६०० फूट) पेक्षा जास्त आहे.

जर काहींना पर्वत श्रेणी ट्रेक करणे शक्य नसेल, तर ते पुर्ण हिमालया चा अफाट आनंद दुरून पाहून पण घेऊ शकतात. त्यामुळेच आम्ही आपणास अदभूत उत्तराखंड यात्रेतुन उत्तराखंड मधील अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि हिमालयाचे विलोभनीय दृश्य यांचा आनंद देतो. या यात्रेत अजुन आपण आनंददायक पाताळ भुवनेश्वर गुहेला भेट देतो आणि महावतार बाबाजी गुहेत ध्यान सत्र ही करू शकतो ज्यामुळे आपल्यात आत्मशांती जागरूक होते.

या अदभूत उत्तराखंड यात्रेत हिमालय पर्वत शिखरे पाहणे आणि उत्तराखंडच्या (कुमांव प्रदेश) प्रसन्न सौंदर्याचा आनंद घेणे हे सर्व काही आहे.

प्रवासातील समाविष्ट स्थळे

कौसानी

कौसानी (६००० + फूट) येथे हिवाळ्यामध्ये (ऑक्टोबर -मार्च) आपल्याला सर्व कुमाऊॅं वस्त्या वर सर्वोत्तम हिमालय दृश्ये दिसतात. गढवाल आणि कुमाऊॅं (कर्णप्रयाग मार्गे) ला जोडणारा मार्गावर तात्पुरता मुक्काम असतो. हे एक शांत आणि प्रसन्न ठिकाण आहे. आपल्या कुटुंबासोबत दोन दिवस खर्च करण्यासाठी आराम करण्यासाठी हे एक आदर्श स्थान आहे. येथे अधिक वाचा...

दवाराहाट

दवाराहाट हे एक गाव असून उत्तराखंड राज्यातील अल्मोरा जिल्ह्यातील नगर पंचायत पण आहे.शिवाय तुम्ही जवळच असलेल्या कुकूचीना गावात पण जाऊ शकता जेथे प्रसिद्ध महावतार बाबाजी गुहा आहे.

पाताळ भुवनेश्वर

पाताळ भुवनेश्वर हि एक नैसर्गिक व आश्चर्य वाटनारी गुहां आहे. पाताळ भुवनेश्वर गुहां ९० फूट खोल आणि १६० मीटर लांब आहे. तेथे हिंदू धर्मातील ३३ कोटी देव राहिले असल्याचे सांगितले जाते. तुम्ही या गुहांमध्ये भगवान शिवांची जटा देखील पाहू शकता.

राणीखेत

राणीखेत उत्तराखंड राज्यातील अल्मोरा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आणि छावनी गाव आहे.हे लष्करी रुग्णालय, कुमाऊॅं रेजिमेंट (KRC),नागा रेजिमेंट साठी घर आहे. त्यांची सर्व देखरेख भारतीय लष्कराने ठेवली आहे राणीखेत ची समुद्रसपाटीपासूनची उंची १.८६९ मीटर (६,१३२ फूट) आहे आणि ते हिमालयाच्या पश्चिम शिखरांच्या आत आहे. तसेच राणीखेत येथे हैडा खान आश्रम पण आहे.

नैनिताल

नैनिताल हे भारतातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. नैनिताल हे उत्तराखंड मधील एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे, ते 2.084 मीटर (6,837 फूट) उंचीवर वसलेले आहे. आत्ता पण नैनिताल जिल्ह्यात सगळ्यात जास्त तलाव आहेत. भारताचा ' lake district' म्हणतात, कारण त्याचे संपूर्ण क्षेत्र तलावाने वेढलेले आहे.



छायाचित्र

येथे काही निवडक छायाचित्र उपलब्ध आहेत - अधिक छायाचित्र बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.

राणीखेत

नैनिताल

कौसानी



राहण्याची व्यवस्था

कृपया लक्षात ठेवा:
  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे
  • एसी / नॉन एसी चे प्राधान्य दिले जाऊ शकते
  • हॉटेल रूममधील ऑर्डर्स चे वेगळे चार्ज लागतील.

नैनिताल

कौसानी
राणीखेत


वाहतूक

  • तुमचे शहर ते दिल्ली - हवाई प्रवास
  • नवी दिल्ली ते काठगोडम - शताब्दी
  • काठगोडम ते काठगोडम तवेरा कार (एक कार मध्ये ८ जण)

रेल्वे आरक्षणाची पुष्टी करण्यासाठी प्रथमता आपण आपल्या तारखांची उपलब्धता आमच्या कर्मचारींशी निश्चित करा.

ठळक वैशिष्ट्ये

** तिकीट उपलब्धतेवर आधारित **

हवाई प्रवासावर उत्तम सवलत मिळविण्यासाठी 3 महिने आधीच बुकींग करा. रेल्वे आरक्षण आता 4 महिने आगाऊ करावे लागते.



समावेश

  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे.
  • सर्व रेल्वे टिकीट वरती दिल्या प्रमाने.
  • सर्व बस टिकीट वरती दिल्या प्रमाने.
  • सर्व वाहतूक ही स्थानिक व्यवस्थेनुसार(विना एसी कार).
  • नाश्ता आणि रात्रीचे जेवण (शुद्ध शाकाहारी).
  • प्रवास विमा उपलब्ध पर्यायी - खर्च अतिरिक्त.
  • स्थानिक मार्गदर्शक सर्व ठिकाणांसाठी.


वगळीत

  • कॅमेरा शुल्क (जर असेल तर) .
  • वैयक्तिक खरेदी खर्च.
  • रेल्वे आणि उड्डाण विलंब,वाहन असो किंवा रस्त्यातील अडथळे, राजकीय अडथळे इत्यादी कारणांमुळे झालेला खर्च आमच्या नियंत्रणात असेल.
  • अल्कोहोलिक / नॉन अल्कोहोलिक शीतपेये.
  • टिप्स, लॉन्ड्री आणि फोन कॉल.
  • हॉटेल्स रूमधील कोणत्याही ऑर्डस.
  • कोणतेही अतिरिक्त खर्च.
  • पूजा प्रसाद साहित्य.
  • ९% GST.


यात्रेचा तपशील

दिवस पहिला पुणे, मुंबई पासून रवाना : नवी दिल्ली येथे आगमन.
दिवस दुसरा
  • नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर रिपोर्ट करणे.
  • रेल्वे प्रवास काठगोठडम साठी - शताब्दी एक्सप्रेस
  • नैनिताल कडे मार्गस्थ
  • नैनिताल येथे हॉटेल चेक इन
  • नैनिताल प्रेक्षणीय स्थळ पाहणे
  • रात्रीचे जेवण आणि नैनिताल ला रात्रभर मुक्काम
दिवस तिसरा
  • नैनिताल प्रेक्षणीय स्थळ पाहणे
  • बिनसार कडे मार्गस्थ (९२ किमी)
  • हॉटेल कडे परत
  • कटरमल सूर्य मंदिर भेट
  • बिनसार अभयारण्य भेट
  • रात्रीचे जेवण आणि हॉटेल ला रात्रभर मुक्काम
दिवस चौथा
  • सकाळी लवकर पाताळ भुवनेश्वर कडे मार्गस्थ.
  • अविस्मर्णिय अशा पाताळ भुवनेश्वर गुहेला भेट.
  • चौकोरी कडे मार्गस्थ.
  • रात्रीचे जेवण आणि हॉटेल ला रात्रभर मुक्काम.
दिवस पाचवा
  • सकाळी लवकर वेक अप कॉल - चौकोरीला येथे सूर्योदय.
  • प्रेक्षणीय स्थळ पाहणे , बागेश्वर कडे मार्गस्थ.
  • बागेश्वर येथील प्रेक्षणीय स्थळ पाहणे.
  • रात्रीचे जेवण आणि रात्रभर मुक्काम.
दिवस सहावा
  • बागनाथ मंदिर भेट.
  • प्रेक्षणीय स्थळ पाहणे, बागेश्वर सोडणे.
  • कौसानी मधे आगमन , हॉटेल चेक इन
  • अनासक्ती आश्रम भेट
  • रात्रीचे जेवण आणि रात्रभर मुक्काम
दिवस सातवा
  • सकाळी लवकर द्वारहाट - कुकूचीन प्रवास .
  • महावतार बाबाजी गुफा (२ तास ट्रेक).
  • दूणगिरी मंदिर भेट.
  • गोलू देवता मंदिर भेट.
  • हॉटेल कडे परत - कौसानी.
  • रात्रीचे जेवण आणि आराम .
दिवस आठवा
  • स्थानिक रुद्राधारी धबधबा कडे रवाना
  • नैनिताल कडे रवाना.
  • नैनिताल ला आगमन - हॉटेल चेक इन.
  • प्रेक्षणीय स्थळ पाहणे.
  • रात्रीचे जेवण आणि आराम .
दिवस नववा
  • नैनिताल पासून सकाळी लवकर रवाना.
  • काठगोदाम कडे रवाना
  • नवी दिल्ली कडे रवाना - ट्रेन
  • नवी दिल्ली ला आगमन
  • नवी दिल्ली विमानतळ ला आगमन.
  • पुणे / मुंबई कडे रवाना.


खर्च

लवकरच घोषणा केली जाईल



नियम आणि अटी

  • या धार्मिक दौरा / यात्रा आहे.
  • मद्यपानास सक्त मनाई आहे
  • वरील दर किमान २ प्रौढ व्यक्तींसाठी एकत्र प्रवास वैध आहेत.
  • या यात्रेसाठी हवाई प्रवास नाही आहे.
  • कोणत्याही वेळी अतिरिक्त कर किंवा सरकारी शुल्क या बाबतीत बदल झाल्यास आपल्या ठरविलेल्या दरामध्ये बदल होऊ शकतो.
  • जर दिलेल्या प्रवास योजनेत कोणतेही वेगळे जेवण किंवा सेवा नमूद केली नसेल तर त्या गोष्टींचा प्रवासात समावेश होणार नाही.
  • प्रवास योजनेत उल्लेख केलेल्या हॉटेल्स जर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत तर पर्यायी समान वर्गातील हॉटेल्स निवास व्यवस्था केली जाईल.
  • इझीटूर्स कोणत्याही प्रवाश्याला नाकारण्याचा अधिकार ठेवते.

पेमेंट पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • आगाऊ ३ महिने : यात्रा खर्चा च्या ६०%.
  • आगाऊ २ महिने : यात्रा खर्चा च्या ७०%.
  • आगाऊ १ महिने : यात्रा खर्चा च्या १००%.
पेमेंट रोख,चेक किंवा ऑनलाईन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून केले जाऊ शकते.

रद्द करण्याची पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • जाण्याच्या ३० किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या २५%.
  • जाण्याच्या १५ किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या ५०%.
  • जाण्याच्या ४ ते ७ दिवस आधी : १००% यात्रा खर्च.



यात्रेच्या तारखा

डिसेंबर २०१७ - नोंदणी सुरु
जानेवारी २०१८ - नोंदणी सुरु
फेब्रुवारी २०१८ - नोंदणी सुरु
मार्च २०१८ - नोंदणी सुरु
एप्रिल २०१८ - नोंदणी सुरु


इच्छा व्यक्त करा

यात्रेसाठी इझीटूर्स हा एक नियोजित आणि आर्थिकदृष्ट्या खुप उत्तम पर्याय आहे!

तुमची इच्छा आहे पण तुम्हाला अद्याप काही शंका / प्रश्न असतील आणि आपण अधिक माहितीसाठी बोलू इच्छिता! तर आपण फक्त आम्हाला आपले नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर देऊ शकता आणि आमच्या कार्यकारी व्यवस्थापकांकडून लगेच तुम्हाला मदत मिळेल!


त्यांच्या शब्दांत: पुनरावलोकने

An amazing trip to Himalaya and visit to Mahavtar Babaji Cave, would not have been possible without EziiTours. I have been waiting for this visit for almost 10 years .... Read More

Yogendra RajputHP, Bangalore

VERY well planned tour.... awesome facility.....accommodation and food service is good.....you guys are doing good job..... I enjoyed lot.....thank you EziiTours.....

EziiTours बरोबर मी गिरनार वारी केली होती...कधीही न विसरता येईल असा सुंदर अनुभव ह्या वारी मधे आला... मी व्यक्तीश: चेतन चे आभार मानतो की त्याने ह्या ठिकाणाचे दर्शन उत्तम रितीने घडवुन आणले.. चेतनच्या पुढील सहलिंना शुभेच्छा..

सौराष्ट्रात काठेवाड प्रांतात जुनागड संस्थानात गिरनार पर्वत स्थित आहे..साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पर्वतावर दत्तगुरूंचा नित्य निवास असतो.दत्तगुरूंच्या कृपाशिर्वादाची अनुभूति घेण्यासाठी गिरनारला इजी टूरसोबत जरूर भेट द्या. जय गिरनारी पार लगा दो नैय्या हमारी

सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार की तुमच्यासोबत मला द्वारका-सोमनाथ-गिरनार ही ट्रिप करायला मिळाली. खुप दिवसांपासून गिरनार दर्शन करायचं मनात होतं ते तुमच्यामुळे शक्य झाले. बाकी तुमच्या सर्व्हिसबद्दल सांगायचे तर खूप उत्तम दर्जाची सर्व्हिस मिळाली. एक धार्मिक ट्रिप असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. पुण्यापासूनचा एकूण प्रवास, जेवण, हॉटेल या सर्वांची खुप उत्तम सोय तुम्ही केली, कमी पैसे घेऊनसुद्धा यांच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. ...

EziiTours provided us with an excellent set of facilities at affordable rates. One can say " A guaranteed dream journey with a divine eperience." Superb!!!