चारधाम यात्रा

१२ दिवस / ११ रात्री


| EN | MR | HI |


पासून सुरू22500

परिचय

उत्तराखंड येथील गढवाल क्षेत्रात हिमालयातील चार पवित्र ठिकाणे आहेत. जे भारतात "छोटे चारधाम" म्हणून प्रसिद्ध आहेत. यांत बद्रीनाथ, गंगोत्री, केदारनाथ आणि यमुनोत्री यांचा समावेश होतो. या चार पवित्र ठिकाणांपैकी केदारनाथ हे भगवान महादेवांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. बद्रीनाथ येथे भगवान श्री विष्णूं चे प्रसिद्ध मंदिर आहे आणि यमुनोत्री व गंगोत्री ही ठिकाणे यमुना आणि गंगा (पवित्र गंगा) या पवित्र नद्यांना समर्पित आहेत. धार्मिक दृष्ट्या चारधाम यात्रा पुर्ण करणे प्रत्येक हिंदूसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट मानली जाते. आम्हाला इझीटूर्स तर्फे अभिमान वाटेल की आम्ही आपणास चारधाम यात्रेचा संपूर्ण अनुभव चांगल्यापरीने देऊ शकु.

ही इकॉनॉमी क्लास ची धार्मिक याञा आहे. या याञेत राहण्यासाठी उत्तम हॉटेल्स चा समावेश आहे. केदारनाथ साठी हेलिकॉप्टर चे स्वतंत्रपणे शुल्क आकारले जातील - कृपया याची पुष्टी आपण याञा बुक करण्यापूर्वी करून घेणे. या याञेच्या तारखा मर्यादित आहेत.

बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619034948 | 9619531595छायाचित्र

येथे काही निवडक छायाचित्र उपलब्ध आहेत - अधिक छायाचित्र बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.राहण्याची व्यवस्था

कृपया लक्षात ठेवा:
 • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे
 • एसी / नॉन एसी चे प्राधान्य दिले जाऊ शकते
 • हॉटेल रूममधील ऑर्डर्स चे वेगळे चार्ज लागतील.

उत्तरकाशी

बद्रीनाथवाहतूक

 • नॉन एसी कार
 • हेलिकॉप्टर राइड***

ठळक वैशिष्ट्ये.

 • जे चारधाम यात्रा करू इच्छिता त्यांच्यासाठी इझीटूर्स कडून इकॉनॉमी टूर ची संपुर्ण माहीती.
 • याञेत ही ठिकाणे पण समाविष्ट आहेत :
 • स्थानिक प्रवास कारने आणि सोबत संपुर्ण स्थानिक माहीती असलेला मार्गदर्शक


समावेश

 • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे.
 • सर्व वाहतूक ही स्थानिक व्यवस्थेनुसार(विना एसी कार).
 • नाश्ता आणि रात्रीचे जेवण (शुद्ध शाकाहारी).
 • प्रवास विमा उपलब्ध पर्यायी - खर्च अतिरिक्त.


वगळीत

 • कॅमेरा शुल्क (जर असेल तर)
 • वैयक्तिक खरेदी खर्च
 • रेल्वे आणि उड्डाण विलंब,वाहन असो किंवा रस्त्यातील अडथळे, राजकीय अडथळे इत्यादी कारणांमुळे झालेला खर्च आमच्या नियंत्रणात असेल.
 • अल्कोहोलिक / नॉन अल्कोहोलिक शीतपेये.
 • टिप्स, लॉन्ड्री आणि फोन कॉल
 • हॉटेल्स रूमधील कोणत्याही ऑर्डस
 • कोणतेही अतिरिक्त खर्च
 • पूजा प्रसाद साहित्य
 • ५% GST


मुक्काम योजना

 • दोन राञ हरिद्वार येथे
 • एक राञ खरसली येथे
 • एक राञ बारकोट येथे
 • दोन राञ उत्तरकाशी येथे
 • दोन राञ गुप्तकाशी येथे
 • एक राञ केदारनाथ येथे
 • एक राञ बद्रीनाथ येथे
 • एक राञ रुद्रप्रयाग येथे


यात्रेचा तपशील

दिवस पहिला दिल्ली ते हरिद्वार (230 कि मी साधारण 6 ते 7 तास प्रवास) दिल्लीत आल्यावर आमचे प्रतींनिधी तुम्हाला भेटतील, तिथून पुढे आपण ग्रुप सोबत हरिद्वार साठी रवाना. हरिद्वारला पोचल्यावर हॉटेल मध्ये चेक इन करून मग हर कि पौरी म्हणजेच गंगा आरती घेणे. रात्री हरिद्वार येथे मुक्काम
[जेवण व्यवस्था: रात्रीचे जेवण]
दिवस दूसरा हरिद्वार - खरशाली (बारकोट) (205 कि मी साधारण 7 ते 8 तास प्रवास) सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर बारकोट साठी रवाना, बरकोट म्हणजे यमुनोत्रीच्या पायथ्याशी असेलेले स्थान. जाताना मसूरी, केंप्ट फॉल्स पाहत आपण खरशाली येथे आपल्या हॉटेल वर येतो. हॉटेल मध्ये चेक इन आणि बाकीचा वेळ आराम. रात्री हॉटेल वर मुक्काम.
[जेवण व्यवस्था: ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण]
दिवस तिसरा बारकोट - यमुनोत्री - बारकोट (36kms drive & 6kms Trek one side) सकाळी ब्रेकफास्ट झाला कि जानकीचट्टी किंवा फुलचट्टी पर्यन्त गाडीने. मग पुढे यमुनोत्री पर्यन्त ट्रेक (साधारण 6 कि मी चा ट्रेक आहे). इथे आपण डोली किंवा पोनी करू शकता (खर्च वेगळा). यमुनोत्रीला पोचल्यावर इथे लोक गरम पाण्याच्या कुंडात रूमलात तांदूळ बांधून भात बनावतात - आणि तोच प्रसाद म्हणून खातात. इथेच दिव्य शिला आहे ज्याची लोक पुजा देखील करतात. यमुनोत्री दर्शन झाल्यावर परत खाली येऊन गाडी ने हॉटेल साठी रवाना. रात्रीचा मुक्काम बारकोट च्या हॉटेल मधेच
[जेवण व्यवस्था: ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण]
दिवस चौथा बारकोट ते उत्तरकाशी (100 कि मी साधारण पाच तास प्रवास) सकाळी ब्रेकफास्ट झाला कि मनेरी साठी रवाना. हॉटेल मध्ये चेक इन करून - संध्याकाळी विश्वनाथ देवळाला भेट. रात्री मनेरी मध्ये मुक्काम. उत्तरकाशी हे भागीरथी नदीच्या काठी आहे. इथेच भगवान विश्वनाथ ह्यांचे देवूळ आहे - इथेच एक भव्य त्रिशूळ देखील आहे जो पाहण्यासारखा आहे.
[जेवण व्यवस्था: ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण]
दिवस पाचवा उत्तरकाशी - गंगोत्री - उत्तरकाशी (100 कि मी - साधारण 5 तास प्रवास एका वेळचा) आज आपण ब्रेकफास्ट झाल्यावर भेट देतो गंगोत्रीला - जाताना हरशील गावातून भागीरथीच्या किनार्‍याला लागून अतिशय निसर्गरम्य अश्या हिमालयाचे दृश्य पाहत जातो. गंगोत्री म्हणजेच गंगेचे उगमस्थान - इथे दर्शन झाल्यावर रात्री परत उत्तरकाशीला हॉटेल वर येऊन मुक्काम.
[जेवण व्यवस्था: ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण]
दिवस सहावा उत्तरकाशी ते गुप्तकाशी (साधारण 210 कि मी - 8 ते 9 तास प्रवास) सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर गुप्तकाशी साठी रवाना. जाताना मंदाकिनी नदी आपण पाहू शकतो, मंदाकिनी नदीचा उगम केदारनाथ येथे होतो. गुप्ताकाशीला आगमन - हॉटेल चेक इन आणि नंतर अर्ध नरीश्वर मंदिराला भेट. रात्री हॉटेल वर मुक्काम
[जेवण व्यवस्था: ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण]
दिवस सातवा गुप्तकाशी ते केदारनाथ (30 कि मी गाडीने - 20 कि मी ट्रेक) सकाळी सोनप्रयाग साठी रवाना. सोनप्रयाग येथून ट्रेकला सुरवात. (3584 मीटर 12000 फुट उंच) अश्या केदारनाथला जाताना आपण पायी देखील जाऊ शकता किंवा डोली अथवा पोनी देखील करू शकता (स्वखर्चाने). इथे जाताना सर्वांनीच आपली औषधे, रात्रभरसाठी लागणारे कपडे आणि जॅकेट जवळ बाळगावे. केदारनाथला आगामन आणि टेंट मध्ये विश्राम. रात्रभर केदारनाथ मधेच. अधिक महितीसाठी येथे क्लिक करावे
[जेवण व्यवस्था: ब्रेकफास्ट ]
दिवस आठवा केदारनाथ ते सोनप्रयाग आणि गुप्तकशी (20 कि मी ट्रेक आणि 30 कि मी गाडीने) केदारनाथला सकाळी लवकर उठून, आंघोळ करून 4.45 वाजता अभिषेक. इथे सर्वच जण गर्भ गृहात जाऊ शकतात आणि हाथ देखील लाऊ शकतात. दर्शन झाल्यावर परतीचा ट्रेक (डोली / पोनी व्यवस्था - ज्याची त्याची) - खाली आल्यावर गाडीने परत हॉटेल साठी रवाना. रात्री हॉटेल मधेच मुक्काम.
[जेवण व्यवस्था: रात्रीचे जेवण]
दिवस नववा गुप्तकाशी ते बद्रिनाथ (190 किमी साधारण ७ तास प्रवास ) बद्रिनाथ साठी रवाना, जाताना जोशीमठ वरून - बद्रीनाथला पोचल्यावर हॉटेल मध्ये चेक इन आणि संध्याकाळी पांडुकेश्वर ला भेट. रात्री हॉटेल वर आराम.
[जेवण व्यवस्था: ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण]
दिवस दहावा बद्रीनाथ ते रुद्रप्रयाग (जोशीमठ मार्गे) (१६५ कि मी साधारण ७ ते ८ तास प्रवास) सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर लवकर म्हणजे ७ वाजताच निघून बद्रिनाथ साठी रवाना. बद्रीनाथला आगमन आणि हॉटेल मध्ये चेक इन - रात्री बद्रीनाथ मध्ये मुक्काम. वेगवेगळ्या ठिकणाबद्दल माहिती इथे पहा
[जेवण व्यवस्था: ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण]
दिवस अकरावा रुद्रप्रयाग ते ऋषिकेश आणि हरिद्वार (१६० कि मी साधारण ६ ते ७ तास प्रवास) सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर लवकर निघून ऋषिकेश कडे प्रयाण. ऋषिकेश हे आध्यात्मिक शहर मानले जाते व त्याच बरोबर बरोबर योगा ची राजधानी म्हणून देखील प्रख्यात आहे. इथे आपण ऋषिकेशला राम झूला आणि लक्ष्मण झूला पाहून पुढे हरिद्वार कडे प्रस्थान करतो. रात्री हरिद्वारला मुक्काम.
[जेवण व्यवस्था: ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण]
दिवस बारावा हरिद्वार ते दिल्ली (२३० कि मी साधारण ६ ते ७ तास प्रवास) सकाळी ब्रेकफास्ट चेक आऊट करून दिल्ली साठी रवाना. दिल्लीला पोचल्यावर हॉटेल, अथवा रेल्वे स्टेशन अथवा एयरपोर्ट येथे ड्रॉप. यात्रा समाप्त.
[जेवण व्यवस्था: ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण]
बद्रिनाथ बद्दल
बद्रीनाथ: म्हणजेच चारधाम पैकी एक सगळ्यात प्रख्यात धाम. ह्याची ऊंची साधारण ३१३३ मीटर म्हणजेच साधारण १०,००० फुट अशी आहे. बद्रिनाथच्या दोन्ही बाजूचे डोंगर म्हणजे नर आणि नारायण आहेत आणि समोरचा नीलकंठ पीक ज्या मुळे अत्यंत नैसर्गिक रित्या एक सुंदर चित्राचे स्वरूपच बद्रिनाथला मिळते. पूर्वी हाच भू भाग वन्य बेरींनी भरलेला असायचा म्हणूनच ह्याचे नाव बद्रिकावन असे पडले. इथे आपण पाहू शकतो:
 • तप्त कुंड: नैसर्गिक रित्या तयार झालेल्या थरम्ल स्प्रिंग्स म्हणजेच गरम पाण्याचे कुंड अलकनंदा नदीच्या किनारी. बद्रिनाथ देवलयात प्रवेश करायच्या आधी येथे आंघोळ कारायची प्रथा आहे.
 • नारद कुंड: इथे जवळच एक कुंड आपल्याला पहायला मिळतो ज्याला नारद कुंड म्हणतात. हे तेच ठिकाण आहे जिथे भगवान बद्रीनाथांची मूर्ति सापडली होती.
 • ब्रह्म कपाल: अलाखनंदा नदीच्या किनारी चे ठिकाण जिथे बहुतांशी हिंदू आपल्या पितरांचे कार्य करतात.
 • शेषनेत्र: साधारण १.५ कि मी. वर असलेला हा एक मोठा दगड आहे ज्याला शेषनागाचा डोळा असल्याची मान्यता आहे.
 • चरणपादुका: साधारण तीन किमी वर असलेले ठिकाण जिथे साक्षात भगवान विष्णुंचे चरण आपल्याला पाहाला मिळतात.
 • माता मूर्ति मंदिर: हे देवूळ भगवान बद्रिनाथ ह्यांच्या आईला समर्पित केले आहे.
 • माना गाव: ह्या गावात आपल्याला मांगोलियन लोकांचे वास्तव्य आढळते, हे गाव भारत आणि तिबेट च्या मध्ये असलेले शेवटचे गाव आहे.
 • वसुंधरा: वसुंधरा म्हणजे एक सुंदर धबधबा आहे जो आपल्याला पाहाला मिळतो. हे ठिकाण माना गावापासून ३ कि मी वर आहे.
 • भीम पूल: माना गावाच्या दुसर्‍या बाजूला सरस्वती नदी वाहते, आणि इथेच आपल्याला पाहाला मिळतो तो एक भव्य दिव्य दगड ज्याला भीम पूल असेल म्हणतात. लोकांची अशी मान्यता आहे कि भीमाने येथे हा विशाल दगड ठेवला.
 • व्यास गुफा:व्यास ऋषींची गुफा अशी मान्यता असलेले ठिकाण
केदारनाथ बद्दल
कृपया लक्षात ठेवावे:
 • केदारनाथला जेवणासाठी अनेक निशुल्क लंघर आहेत
 • केदारनाथला राहण्यासाठी टेंट घ्यावे लागते ज्याची किम्मत साधारण ३००-५०० पर्यन्त असते - प्रत्येकाने किंवा ग्रुप ने ही रक्कम स्वतच्या स्वतच द्वावी लागते.
 • ज्यांना केदारनाथ हेलिकॉप्टर ने करावयाचे असेल त्यांनी आधीच कळवावे, केदारनाथ हेलिकोप्टर चे अतिरिक्त शुल्क ७८०० रु मात्र आहे. जे यात्रेकरू केदारनाथला हेलिकॉप्टर ने जातील ते दर्शन घेऊन त्याच दिवशी परत येतील आणि रात्री त्यांचा मुक्काम हॉटेल वरच असेल.
 • हेलिकॉप्टर बुकिंग साठी - आमच्याशी आधीच संपर्क साधावा.
बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619034948 | 9619531595सेवा शुल्क

New Delhi Economy 22500 Group Tour - Standard Hotels
New Delhi Premium 25200 Group Tour - Deluxe Hotels

नियम आणि अटी

 • या धार्मिक दौरा / यात्रा आहे.
 • मद्यपानास सक्त मनाई आहे
 • वरील दर किमान २ प्रौढ व्यक्तींसाठी एकत्र प्रवास वैध आहेत.
 • या यात्रेसाठी हवाई प्रवास नाही आहे.
 • कोणत्याही वेळी अतिरिक्त कर किंवा सरकारी शुल्क या बाबतीत बदल झाल्यास आपल्या ठरविलेल्या दरामध्ये बदल होऊ शकतो.
 • जर दिलेल्या प्रवास योजनेत कोणतेही वेगळे जेवण किंवा सेवा नमूद केली नसेल तर त्या गोष्टींचा प्रवासात समावेश होणार नाही.
 • प्रवास योजनेत उल्लेख केलेल्या हॉटेल्स जर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत तर पर्यायी समान वर्गातील हॉटेल्स निवास व्यवस्था केली जाईल.
 • इझीटूर्स कोणत्याही प्रवाश्याला नाकारण्याचा अधिकार ठेवते.

पेमेंट पॉलिसी

बुकिंग शुल्क

 • आगाऊ ३ महिने : यात्रा खर्चा च्या ६०%.
 • आगाऊ २ महिने : यात्रा खर्चा च्या ७०%.
 • आगाऊ १ महिने : यात्रा खर्चा च्या १००%.
पेमेंट चेक किंवा ऑनलाईन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून केले जाऊ शकते. इझीटूर्स कुठल्याही परिस्तिथी मध्ये रोख रक्कम स्वीकारत नाही.

रद्द करण्याची पॉलिसी

बुकिंग शुल्क

 • जाण्याच्या ३० किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या २५%.
 • जाण्याच्या १५ किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या ५०%.
 • जाण्याच्या ४ ते ७ दिवस आधी : १००% यात्रा खर्च.यात्रेच्या तारखा

May 2019 10th May 2019 TO 21st May 2019
(Group Departure: 60 seats available)
May 2019 16th May 2019 TO 27th May 2019
(Group Departure: 60 seats available)
May 2019 30th May 2019 TO 10th June 2019
(Group Departure: 60 seats available)
June 2019 02nd June 2019 TO 13th June 2019
(Group Departure: 60 seats available)
June 2019 06th June 2019 TO 17th June 2019
(Group Departure: 60 seats available)
June 2019 09th June 2019 TO 20th June 2019
(Group Departure: 60 seats available)
June 2019 15th June 2019 TO 26th June 2019
(Group Departure: 60 seats available)
June 2019 18th June 2019 TO 29th June 2019
(Group Departure: 60 seats available)
June 2019 20th June 2019 TO 01st July 2019
(Group Departure: 60 seats available)
June 2019 25th June 2019 TO 06th July 2019
(Group Departure: 60 seats available)


इच्छा व्यक्त करा

यात्रेसाठी इझीटूर्स हा एक नियोजित आणि आर्थिकदृष्ट्या खुप उत्तम पर्याय आहे!

तुमची इच्छा आहे पण तुम्हाला अद्याप काही शंका / प्रश्न असतील आणि आपण अधिक माहितीसाठी बोलू इच्छिता! तर आपण फक्त आम्हाला आपले नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर देऊ शकता आणि आमच्या कार्यकारी व्यवस्थापकांकडून लगेच तुम्हाला मदत मिळेल!


त्यांच्या शब्दांत अभिप्राय

An amazing trip to Himalaya and visit to Mahavtar Babaji Cave, would not have been possible without EziiTours. I have been waiting for this visit for almost 10 years .... Read More

Yogendra RajputHP, Bangalore

VERY well planned tour.... awesome facility.....accommodation and food service is good.....you guys are doing good job..... I enjoyed lot.....thank you EziiTours.....

EziiTours बरोबर मी गिरनार वारी केली होती...कधीही न विसरता येईल असा सुंदर अनुभव ह्या वारी मधे आला... मी व्यक्तीश: चेतन चे आभार मानतो की त्याने ह्या ठिकाणाचे दर्शन उत्तम रितीने घडवुन आणले.. चेतनच्या पुढील सहलिंना शुभेच्छा..

सौराष्ट्रात काठेवाड प्रांतात जुनागड संस्थानात गिरनार पर्वत स्थित आहे..साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पर्वतावर दत्तगुरूंचा नित्य निवास असतो.दत्तगुरूंच्या कृपाशिर्वादाची अनुभूति घेण्यासाठी गिरनारला इजी टूरसोबत जरूर भेट द्या. जय गिरनारी पार लगा दो नैय्या हमारी

सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार की तुमच्यासोबत मला द्वारका-सोमनाथ-गिरनार ही ट्रिप करायला मिळाली. खुप दिवसांपासून गिरनार दर्शन करायचं मनात होतं ते तुमच्यामुळे शक्य झाले. बाकी तुमच्या सर्व्हिसबद्दल सांगायचे तर खूप उत्तम दर्जाची सर्व्हिस मिळाली. एक धार्मिक ट्रिप असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. पुण्यापासूनचा एकूण प्रवास, जेवण, हॉटेल या सर्वांची खुप उत्तम सोय तुम्ही केली, कमी पैसे घेऊनसुद्धा यांच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. ...

EziiTours provided us with an excellent set of facilities at affordable rates. One can say " A guaranteed dream journey with a divine eperience." Superb!!!