केरळ कन्याकुमारी यात्रा

१० दिवस / ०९ रात्री

भारताच्या दक्षिणेस असलेल्या केरळच्या किनारपट्टीवर एक पातळ तुकतुकीत आकारमानचे एक भूदृश्य बनले गेले आहे: जवळजवळ ६०० किमी उंच गौरवशाली अरेबियन सागर किनारा आणि अत्याधुनिक चहाचे उद्यान, धबधबे आणि आकर्षक हिरवळ - हे केरला आकर्षण आहे ते. त्यामुळे येथे देवाचा वास आहे असे वाटते.

भारतमातेच्या शिरावरील मुकुट म्हणजे हिमालय आणि भारतमातेचे चरणकमल म्हणजे कन्याकुमारी असे म्हटले जाते. एक खाडी, एक सागर आणि एक महासागर यांचा येथे संगम होतो. भारतमातेच्या चरणकमलांवर यामुळे सतत अभिषेक होत असतो. पर्यटनाबाबत बोलताना केरळ कन्याकुमारी असा उल्लेख केला जात असला तरी कन्याकुमारी येते तमीळनाडू राज्यात. पण केरळपासून खूपच जवळ असल्याने केरळ कन्याकुमारी असाच उल्लेख केला जातो. भारतीयांसाठी कन्याकुमारी हे केवळ तीर्थस्थान नाही. येथे भारताची हद्द संपते म्हणूनही त्याचे आकर्षण मोठे आहे. अर्थात देशी पर्यटकांप्रमाणेच परदेशी पर्यटकांतही कन्याकुमारी आवडते पर्यटनस्थळ आहे.राहण्याची व्यवस्था

कृपया लक्षात ठेवा:

वाहतूकसमावेशवगळीतयात्रेचा तपशील

दिवस पहिला संध्याकाळी ७:३० ला त्रिवेंद्रमकडे रेल्वेने निघणे
दिवस दुसरा
 • रेल्वेचा प्रवास.
 • विमानाने कोचीनला पोहचल्यावर त्रिवेंद्रम पर्यंत बस प्रवास
दिवस तिसरा
 • त्रिवेंद्रम रेल्वे स्टेशनवर सकाळी १०:१० वाजता आगमन व येथे सहल सुरु होत आहे.
 • येथून बस किंवा कार तुम्हाला कोवलम बीचजवळील ३ स्टार बीच रेसोर्टवर घेऊन जाईल.
 • हा अंतराष्ट्रीय प्रसिद्ध असा बीच आहे व येथे काय काय करावयाचे आहे हे तुम्हाला प्री टूरमीटिंग मध्ये सांगितले जाईल.
 • दुपारी आपण त्रिवेंद्रम ला लाखो कोटी रुपयांचा खजिना सापडलेल्या पद्मनाभन मंदिराचे दर्शन घेणार आहोत व परत बीचवर खेळण्यास येणार आहोत.
दिवस चौथा
 • कोवलम ते कन्याकुमारी - सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर आपण पूवर लेक आणि कन्याकुमारी येथील प्रेक्षणीय स्थळे बघण्यास जाणार आहोत.
 • यामध्ये पूवर आयलंड, कन्याकुमारी मंदिर, स्वामी विवेकानंद स्मारक, गांधीधाम बघून नंतर बीचवर फिरण्यास जाणार आहोत.
दिवस पाचवा
 • कोवलम ते अलेप्पी - सकाळी नाश्ता झाल्यावर अलेप्पीला संपूर्ण दिवसरात्र हाउसबोटीत वास्तव्य करून अनोखा सफर करणार आहोत.
दिवस सहावा
 • टेक्केडी - सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर आपण टेक्केडी या हिलस्टेशनवर जाणार आहोत.
 • जाताना वाटेत अप्रतिम असे निसर्गसौंदर्य आहे
 • ते बघत आपण पेरियार या अभयारण्यात पोहचतो
 • तेथे बोटिंगसाठी ऑनलाईन बुकिंग करावी लागते.
 • जीप सफारी केल्यास विविध पक्षी प्राणी पाहता येतील.
 • येथे हत्तीवरील सफारी आणि कथकली नृत्य, कराटे शो, जादूचे प्रयोग पाहायला मिळतात.
 • त्याचप्रमाणे येथे मसाल्याच्या आणि आयुर्वेदिक पदार्थांच्या बागा जवळून पाहता येतात.
दिवस सातवा
 • मुन्नार - सकाळी नाश्ता झाल्यानंतर आपण मुन्नार कडे निघणार आहोत.
 • वाटेत अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे.
 • मुन्नारला पोहचल्यावर मुटूपेटी धरण, एको पोइंट, व्ह्यू पोइंट, चहाचे माळे बघून मुक्काम रीसोर्ट मध्ये होईल.
दिवस आठवा
 • मुन्नार - नाश्ता झाल्यावर चहाचा कारखाना आणि म्यूझीअम, एराविकुलम अभयारण्य बघून दुपारी जेवण झाल्यावर तुम्हाला रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्ट वर बस किंवा कार घेऊन जाईल.
 • कायमच्या मनावर कोरलेल्या आनंदाच्या व अतिसुंदर आठवणी मनामध्ये घेऊन टूर समाप्त होते.
दिवस नववा
 • रेल्वेचा प्रवास. विमानाने पुण्यात आगमन.
दिवस दहावा
 • रेल्वेने पहाटे पुण्यात आगमन.


खर्च

Ex कोची *(कोची रेल्वे स्टेशन / विमानतळ येथे रिपोर्टिंग)*
Joining and Leaving१६००० रूपये/-

टीप: पुर्ण पॅकेज किंमतीवर ५% GST(Government Tax)नियम आणि अटी