पिठापूर कुरवपूर दत्तधाम

६ दिवस आणि ५ रात्री

श्री दत्त गुरूंचा पहिला मनुष्यरूपी अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्म ठिकाण म्हणजे पिठापूर. पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे. कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ आहे. हे गोदावरी जिह्यात आंध्रप्रदेशमध्ये सामालकोटाहून १२ कि.मी. दूर वसलेले एक अती लहानसे गाव आहे. या मंदिरात श्रीपादश्रीवल्लभांची, श्री दत्तात्रेयांची व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मुर्त्या आहेत. श्रीदत्तात्रेयांचे तीन अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान व आद्यपीठ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान. श्रीपाद श्रीवल्लभ यांची कर्मभूमी आणि तपस्याभूमी म्हणजे श्रीक्षेत्रं कुरवपूर. जि. रायचूर (कर्नाटक). स्कन्दपुराणात दिलेल्या माहिती प्रमाणे हिमालयातील २८००० योगी आणि सिद्धपुरुषांना साक्षात श्री दत्त महाराजांनी इथेच दर्शन दिले आहे. भक्तांमध्ये असा विश्वास आहे कि श्री दत्त महाराज अजूनही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या येथे दर्शन देत आहेत. कृष्णा नदीच्या पवित्र काठावर वसलेले हे ठिकाण कुरुगुड्डी नावाने सुद्धा ओळखले जाते.

यात्रेत काय काय पाहाल ? :-

कुरवपूर

पिठापूर

विशेष आकर्षणराहण्याची व्यवस्था

कृपया लक्षात ठेवा:

वाहतूक

रेल्वे आरक्षणाची पुष्टी करण्यासाठी प्रथमता आपण आपल्या तारखांची उपलब्धता आमच्या कर्मचारींशी निश्चित करा.समावेशवगळीतमुक्काम योजनायात्रेचा तपशील

दिवस पहिला
 • लोकमान्य टिळक टर्मिनस ( LTT STATION)
 • LTT VSKP EXP ने मुंबई हून मार्गस्थ
 • वेळ – LTT STATION - सकाळी ६.५५ वाजता
 • रात्रभर रेल्वे मध्ये प्रवास
दिवस दुसरा
 • सकाळी ८ वाजता राजामुंद्री मध्ये आगमन
 • नाश्ता केल्यानतर पिठापूर साठी कार / टेम्पो ट्रव्हलर ने रवाना
 • संपूर्ण दिवस दत्तधाम देवस्थान येथे, संध्याकाळी पालखी सेवेत उपस्थिती
 • राजामुंद्री ला परत आणि हॉटेल ला रात्रभर मुक्काम
दिवस तिसरा
 • सकाळी लवकर नाश्ता आणि हॉटेल चेक आउट
 • TATA YPR EXP – दुपारी १२: ५७
 • रात्रभर रेल्वे मध्ये प्रवास
दिवस चौथा
 • मंत्रालयम रोड येथे पहाटे ६.३० वाजता आगमन आणि नंतर हॉटेल मध्ये स्थानांतर
 • कुरवपुर कडे मार्गस्थ
 • रस्त्यात राघवेंद्र स्वामी मठ ला भेट
 • दत्तधाम दर्शन केल्यानंतर हॉटेल ला रात्रभर मुक्काम
दिवस पाचवा
 • मुंबई कडे रवाना
दिवस सहावा
 • पुणे येथे सकाळी आणि मुंबई सीएसटी दुपारी आगमन.
 • टूर ची सांगता.


खर्च

Ex पुणे *(पुणे रेल्वे स्टेशन ला रिपोर्टींग)*
इकॉनॉमीनॉन-एसी ७,५०० रूपये/-
प्रीमियमएसी १०,००० रूपये/-

टीप: पुर्ण पॅकेज किंमतीवर ५% GST(Government Tax)नियम आणि अटीयात्रेच्या तारखा

जानेवारी २०१८ १७ जानेवारी २०१८ - २१ जानेवारी २०१८
फेब्रुवारी २०१८ ०७ फेब्रुवारी २०१८ - ११ फेब्रुवारी २०१८