अभीप्रय (मराठीतून – ०१)

इझीटूर्स चालू होऊन काही थोडेसेच महिने झाले. पण असे अभिप्रय वाचले कि अजून बळ मिळते – कामाची पोचपावती! विशेष धन्यवाद – श्री गुरु सावंत, दीपिका पाटील, श्री समीर देवधर.
 
|| श्री ||
गुरुपौर्णिमेला गिरनार यात्रेचा योग आला, महिना होत आला तरी मन अजूनही त्याच आठवणीत रमते आहे, तो अविस्मरणीय अनुभव आठवून पुन्हा पुन्हा मन सुखावते आहे. याचे सारे श्रेय इझीटूर्सला. सुरवातीपासूनच चेतनचे प्रोत्साहनपर शब्द आणि निलेशचे, “मी आहे ना बरोबर, अजिबात काळजी करू नका” असे आश्वासक शब्द ह्याने मनातली शाशंकता दूर झाली. त्या रात्री खूप खूप पाउस, सोसाट्याचा वारा, मिट्ट अंधार, पायर्यांवरून धबधब्यासारखे वाहणारे पाणी आणि ओलेचिंब होऊन थंडीत कुडकुडत चढणारे आम्ही, मनात सतत महाराजांचा धावा करत होतो. ढग आणि धुके इतके होते कि ब्याटेरीच्या झोतात फक्त दोनच पायऱ्या दिसायच्या.
 
शिखर गाठता येणार का? दर्शन घडणार का? असेच वाटत होते. पण निलेशने खूप व्यवस्थित सांभाळून पुढे नेले. वादळवार्यात त्याने हात घट्ट धरून नेल्यामुळेच चढणे सोप्पे झाले. त्याची मी खरोखरच मनापासून आभारी आहे. तसेच गुरुप्रसाद (गुरु सावंत) ह्याचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. त्याच्या बोलण्यामुळे माझे मानसिक बळ नक्कीच वाढले. मी दमलेली दिसले कि गुरु लगेच म्हणायचा “काकू आता अगदी थोडेच राहिले आहे .. आपण नक्कीच वर व्यवस्तीत पोचणार ..” आणि चालताना देखील खूप वेगवेगळ्या विषयांवरच्या गप्पांमुळे रस्ता केव्हा संपला कळले नाही. कुठेही त्याने मला एकटीला सोडले नाही, अगदी मुला प्रमाणे सांभाळून आणले, म्हणूनच सारे शक्य झाले. दोघांनाही मनापासून धन्यवाद.
 
दर्शन घडल्याचा आनंदच मुळी अविस्मरणीय, केवळ महाराजांची इच्छा म्हणूनच दर्शनाचा योग आला ह्याची जाणीव क्षणोक्षण होत आहे. इझीटूर्समुळे हे सारे शक्य झाले. दत्त भक्तांची ओळख झाली, सर्वांना एकत्र करण्याचे व गिरनार यात्रा घडवण्याचे अवघड काम इझीटूर्स अगदी सहज रित्या पार पडते. अगदी रेल्वेच्या प्रवासा मध्ये देखील सर्वंना एकत्र करण्याचे अवघड काम कुमार ह्यांनी केले त्यामुळे प्रत्येकाला एकमेकांचे अनुभव समजले.
 
आयुष्यात कायम स्मरणात राहील अशी ही ‘अविस्मरणीय’ यात्रा झाली. पुन्हा पुन्हा ग्रुप बरोबर यायला नक्कीच आवडेल.
 
सौ. मीनल साने, कर्वेनगर पुणे.
वय: ५६
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *