Testimonial – Vikram Jagtap – Pune

सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार की तुमच्यासोबत मला द्वारका-सोमनाथ-गिरनार ही ट्रिप करायला मिळाली. खुप दिवसांपासून गिरनार दर्शन करायचं मनात होतं ते तुमच्यामुळे शक्य झाले.
बाकी तुमच्या सर्व्हिसबद्दल सांगायचे तर खूप उत्तम दर्जाची सर्व्हिस मिळाली. एक धार्मिक ट्रिप असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. पुण्यापासूनचा एकूण प्रवास, जेवण, हॉटेल या सर्वांची खुप उत्तम सोय तुम्ही केली, कमी पैसे घेऊनसुद्धा यांच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही.
ट्रिपचे वेळापत्रकही योग्यरित्या तयार केले गेले होते ज्यामुळे एखाद्या दिवशी जास्त प्रवास अथवा एखाद्या दिवशी जास्त आराम असा प्रसंग आला नाही. उत्तम नियोजनामुळे ट्रिपचे सर्व दिवस एकदम आरामात आणि मजेत गेले.


Tour co-ordinator निलेशचे खुप आभार. खुप सहनशील आणि प्रसन्न चेहऱ्याने सर्व ट्रिप त्याने व्यवस्थित सांभाळली.


आणि सर्वात शेवटी EziiTours यांचे मनापासुन आभार की ज्यांच्यामुळे दत्तगुरूंचे पवित्र स्थान श्रीक्षेत्र गिरनारचे दर्शन झाले. इथून पुढेही दत्तगुरूंच्या कृपेने आणि EziiTours च्या मार्फत अशा अनेक ट्रिप घडोत ही दत्तगुरूंचरणी प्रार्थना__/|\__

Vikram Jagtap

धन्यवाद……!!!!

श्री विक्रम जगताप, पुणे ह्यांनी दिलेला अभिप्राय – त्यांच्याच शब्दात!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *